नाती
नाती म्हंटली कि आपल्या समोर येतात ती आई वडिलांचे नाते नवरा बायकोचे नाते आई मुलाचे व मुलीचे नाते
ह्याच्या पलीकडे जाऊन नाती मला आठवतात आम्ही नवराबायको सुशिक्षित त्यामुळे दोघेही नौकरी करीत
घरी कामा साठी आम्हाला लहान मुलगी हवी होती एके दिवशी छोटी संगीता आमच्याकडे चालत आली आणि म्हणाली मी करिते काम तुमच्या कडे आम्ही जरा घाबरतच तिला घरी ठेऊन घेतले ती कशी असेल ह्या विचाराने आह्मी घाबरत होतो पण तिचे आणि माझ्या बायकोचे नात्याला काय नाव द्यायचे हेच मला सुचत नाही ते आई वडील मुलगा मुलगी नवरा बायको ह्यांच्या नात्या पेक्षा वेगळेच
माझा मुलगा घरातील पैसे काही कारण साठी न विचारता घेऊन जाईल पण ह्या मुलीला लोभ नाही ती घरात एकटी असते घरात हझारोनी पडलेल्या नोटांचा तिला शोक असेल पण लोभ नाही तिचे हे वागणे मला थक्क
करून सोडत ती एकदा आजारी पडली तिचे अंग तापाने थरथरत होते माझी पत्नी ओफ्फिचे मधून घरी आली ती ने तिच्या अंगाला हात लावला आणि ताबडतोब हॉस्पिटल ला हलविले आणि सेरेब्रल नेउमोनिअ पासून वाचविले
आमच्या सुख तुखात तिचा फार मोठा वाट आहे माझ्या मुलीचा माझ्यावर नाही अवध तिच्यावर विश्वास आहे .
सांगा पाहू ह्या नात्याला काय म्हणून साम्भोधीत करू






