Thursday, February 24, 2022

संवाद

संवाद 


सिमेंट रस्ता डांबरी रस्त्याला बघून म्हणतो


मी किती भक्कम तो तर फुसका

जरा पावूस  पडला कि वाहून जातोस

तुझ्यावरील खड्डे  पाहून लोक देतात तुला शिव्या

 तरी तू निर्लज्ज तसाच उभा राहतोस काही न करता

माझ्या कडे बघ भक्कम ,पावसाळ्यात सुद्धा

लोक मला पसंत  करतात माझी स्व्तुती करतात

पण सर्व ऐकल्यावर काळा रस्ता पांढऱ्या रस्त्याला म्हणतो

 हे जरी खर असल तरी अधिकारी वर्ग मलाच  पसंत करतात

आज जगात   काळेच रस्ते बांधले जातात

 कारण माझी रस्ता बनवण्य्ची पध्द्त फार सोपी

 आणि माझी घडण्याची किंमत तुच्या पेक्षा  दस पटीने स्वस्त

 भारतासारखा गरीब देशाला मीच  परवडतो

काळा रस्ता पांढऱ्या रस्त्याला मोठ्या दिमाखाने म्हणत होता




No comments:

Post a Comment