एक भाऊ त्याच्या सहा बहिणी; आहेत एका पेक्षा एक
तीन मोठ्या, तर तीन लहान
अशा पुष्पा हेमा यांची मायेची सावली
संध्या विद्या अन नीला यांची मैत्री लाभली
भावावर प्रेम प्रत्येकीचे सारखेच
हेमा जीवाने घास भरवी
पुष्पाच्या सौंदर्य पेक्षा उंच तिची थोरवी
नाव तिचे पुष्पा पण खरी ती लक्ष्मि
ती प्रकट झाली ND च्या रूपाने
अशाचं घावन खायून पुसायचे ताट
नटणार्या संध्याची काही औरच बात !
विद्याच्या श्रध्येने संस्कार जपले घराण्याचे
नीलाच्या जिद्दीने जमले तिला महापौर होणे ठाण्याचे
भावाला शिकवण्यात बहिणींचा मोठा सहभाग
स्वता मौज न करता भावाला शिकवण्यात सगळ्यांनी लावले हाथ
भावाला उच्च शिक्षणासाठी केली मदत
त्याला Ph. D पद्वी मिळावी म्हणून सगळ्याच अग्रेसर
एवढे करून भावाकडून काही अपेक्षा नाही
प्रत्येकीची लग्न झाली
थोरात देसाई शिरोडकर,चौधरी क्षीरसागर आणि इंदुलकर यांच्याशी नाती जुळली
देशमुखांच्या फुलपाकळ्या
आपापल्या संसारात रमल्या.
मुले झाली, कुणी इंजिनीयर तर कुणी डॉक्टर
शिक्षण जणू पाणी भरतय पण;
खासियत त्या बहिणींची, त्यांना गर्व नाही
सासर सांभाळले पण माहेरच्या भावाला विसरल्या नाही
अशीच काही वर्ष लोटली, अचानकपणे भाऊ पडला आजारी
झाले त्याचे हृदय बंद ,करत होता तो मृतुयुशी द्वंद
सर्व बहिणींनी एकत्र येऊन देवाला साकडे घातले
जप केले, तप केले - होम हवन करविले
भावाला वाचविले आणि दिले वाहिनीस सौभाग्य.
अशा माझ्या बहिणी जन्मो जन्मी लाभो हि देवासमोर मागणी


manapasun lihilele pratyek shabdatlya bhavana zalaklya dolyasamor ...... sundar kavita ani bhaav :)
ReplyDeletedear Trupti
DeleteThank you very much